तुमचा प्रतिसाद आवडला. आणि पटलाही. हा लेख लिहीताना चिंपांझीचा विचार माझ्या डोक्यात आला होता. (म्हणजे मानवासदृश प्राणी म्हणुन हो!) पण मी केवळ या लेखकाची मते आणि या पुस्तकाबद्दल लिहीत होते,म्हणुन माझ्या शंका बाजुला ठेवल्या. असो. तुमची मते पटली. राहता राहीला प्रश्न ती अजस्त्र बांधकामे आणि पुर्वजांना असलेल्या (केवळ) खगोलशास्त्रातील वगैरे नैपुण्याचा. पण प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे ते सर्वच बाबतीत निपुण असावेत, आणि या पुस्तकाच्या सोयीसाठी ते जाणुन-बुजुन लपवले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.