ही अशी पुस्तकं आपण परग्रहवासीच आहोत असं वाटायचं. पुढे प्रत्येक गोष्टीला कमीत कमी दोन बाजू असतात असा साक्षात्कार झाला आणि हे खूळ हळू हळू कमी झालं.
खरे सांगायचे तर हा चर्चा प्रस्ताव ठेवण्यामागे हाच हेतु होता. मनोगतावरील विविध क्षेत्रातील लोकांची मते कळतील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे २ बाजु असतील ( ज्या आता दिसायला लागल्या आहेत.) अर्थात मी याला खूळ म्हणणार नाही, त्या पुस्तकामुळे जगातील कितीतरी अद्भुत माहिती मला मिळाली आहे. फक्त फरक एवढाच आहे की हे सर्व 'मानवनिर्मित' आहे आणि मानव देखिल या पृथ्वितलावरचाच आहे हे आता मला या चर्चेत दिलेल्या काही मुद्द्यांवरुन पटले.. अर्थात आधीही पटलेच होते,पण जरा संदेह होता..बाकी तुम्ही लिहीलेले लिपी बद्दल मी काही बोलु नाही शकत,मला काही माहिती नाही. पण एकंदरीत तुमचा अभ्यास दांडगा आहे या विषयावर! ः)