अर्थात मी याला खूळ म्हणणार नाही, त्या पुस्तकामुळे जगातील कितीतरी अद्भुत माहिती मला मिळाली आहे.
मला मी लहान असताना परग्रहवासियांचे वंशज असणे हे खूळ. या विषयावरचा अभ्यास हे 'वेड'. तेंव्हा तुम्ही चालू ठेवा. नव्याने सुरू केलेले सर्व या टप्प्यांतून जात असावेत.
असो. या प्रतिसादात अजून एक मुद्दा घालते. त्रिशूळाचा. याला त्रिशूळ का म्हणावे याबाबत बोलायचे झाल्यास शंकराचा काही एक संबंध नाही. हा trident समुद्रालगत आहे. तेव्हा ग्रीक समुद्रदेव Poseidon (पसायडन) किंवा रोमन देव नेपच्यून यांचे शस्त्र म्हणून त्याला सहसा trident असे समजले जाते.
द. अमेरिकेत त्याला चक्क candlebera (चुकीचे स्पेलिंग असण्याची शक्यता) किंवा candle holder म्हणून ओळखले जाते. समुद्रावरील खलाशांना दीपगृहाप्रमाणे हे समुद्रातून दिसत असल्याने पुढे जमीन आहे हे ओळखण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत असावा अशी शक्यता मांडली जाते.