पण मी असे म्हणतो की जर मनोगतींनी आपले समाजकार्य इथे मनाचा मोठेपणा थोडा वेळ बाजूला ठेवून सांगितले तर त्याचे बरेच फायदेही होतील. जसे -
१. इतर मनोगतींना यातून प्रेरणा मिळेल.
२. इतरांना नवीन मार्ग सापडतील.
३. त्यांच्याविषयी इतर मनोगतींचा आदरही दुणावेल.
४. मनोगत म्हणजे मनोरंजन ही संकल्पना बदलून व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन होईल.
- मोरू