मोरूभाऊ माझा प्रतिसाद बघून 'आता युद्ध सुरू होणार' अशी शंका आल्यास मी आधीच कल्पना देतो की कृपया निश्चिंत रहा. मला एक दोन गोष्टी मांडायच्या आहेत आणि त्या पुढे मी defend करायला परत येणार नाही.
प्रस्तावात मला तरी परत दोन मुद्दे दिसतात १) सोयीप्रमाणे धर्मांतर करणे योग्य आहे का ? २) माणसाची तत्त्वे मोठी की धर्म ?
पैसे मिळतात म्हणून वा मूलभूत गरजा भागतात म्हणून धर्मांतर करणे ह्यात तत्त्वे, धर्म वगैरेला काही महत्त्व असते का, का ती एक सोय म्हणून धर्मांतर केलेले असते हाच मुळी विचार करण्यासारखा एक प्रश्न आहे. कारण तिथे आधी 'आपला धर्म' ह्याबद्दल ममता, जिव्हाळा असे काही असते का हे ही लक्षात घ्यायला हवे. तसे असते तर - 'आता आपल्या मूलभूत गरजा भागल्या, चला आता आपण ज्या धर्मात जन्मलो तिकडे परत जायला हरकत नाही, असे होऊ शकले असते - पण असे माझ्या पाहण्यात नाही, आणि कोणाच्या पहाण्यात आले असेल तर माहित नाही.
मला वाटते धर्मांतर करण्याची " मूलभूत गरजा " व्यतिरिक्त वैचारिक , मतमतांतर वगैरे कारणेही असतात. म्हणजे 'माझ्या धर्मातल्या लोकांशी माझे पटत नाही (वा vice-versa)' असे. पण तिथेही - ' ही system च बेकार आहे, काही अर्थ नाही ' असे म्हणून ' system मध्ये राहून system शी लढा देण्याची माझी कुवत नाही ' हे कारण. या कारणाने धर्मांतर करणे सोयीचे. म्हणून माझ्या मते धर्मांतर हे निव्वळ सोयीसाठी असते. तिथे तत्त्वे वगैरे गोष्टी गौण, नगण्य महत्त्वाच्या. अर्थात सोयीनुसार करणाऱ्या गोष्टी हे त्या गोष्टी करणाऱ्याच्या दृष्टीने बरोबरच. मग इतरांनी अशी गोष्ट करणे चूक का बरोबर हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही. हे माझे मत. चू भू वगैरे अजिबात नाही.