संजीवकुमार हा एक अष्टपैलू अभिनेता होता. आंधी,मौसम सारख्या गंभीर भूमिका आणि अंगूर, सीता और गीता सारख्या हलक्या फुलक्या भूमिका त्याने एकाच ताकदीने पेलल्या होत्या. शिकारमधली त्याची इन्स्पेक्टरची छोटीशी भूमिकाही नायक धर्मेंद्रला खाऊन गेली होती.