लेख आवडला.
देहबोली शब्द आवडला.
गुलजारनं त्याचा प्रभावी वापर करून घेतला आहे ह्याच्याशी १००% सहमत. आँधीमध्ये "कमजोर हो गया हूं।" ह्यातील कमजोर शब्दाचा उच्चार तो असा करतो की उच्चारातूनच अर्थ कळेल. त्यापुढे सुचित्रा सेन "कमजोर कहाँ! थोडेसे दुबले हो गये हो।"  कमजोर-दुबला ह्यातील फरक, हे बारकावे खास गुलजारचे.

अंगूर सगळाच धमाल आहे. पण सुरुवातीला गाडीमध्ये रहस्यकथा वाचताना कथानायकाशी तादात्म्य पावलेला संजीवकुमार, हॉटेलच्या स्वागतकाला पोलिस स्टेशनचा पत्ता विचारल्यावर तो "छोटा या बडा" विचारतो. त्यावर  "मुझे खरीदना नहीं है।" हे वाक्य त्याच्या खास शैलीत म्हणणारा संजीवकुमार, "बहादुर, तू बाप बननेवाला है?" हे पुन्हा पुन्हा विचारणारा  संजीवकुमार हे मला जास्त आवडतात.