माझ्यामते धर्म हा परिस्थितिसापेक्ष असतो. तो स्थलकालाप्रमाणे बदलतो व बदलायलाही हवा. अरबस्तानसारख्या वाळवंटी प्रदेशांतला धर्म हा हिंदुस्थानसारख्या संपन्न देशांतल्या धर्मापेक्षा वेगळाच असणार आहे. तसेच पूर्वीच्या काळचे धर्माचरण आजच्या काळांत योग्य ठरेलच असे नाही. तत्वे मात्र शाश्वत असतात. ती कुठल्या एका धर्माची मक्तेदारी नाही. (इति विवेकानंद). जेव्हा धर्माचरणाबद्दल संभ्रम निर्माण होतो तेव्हा (शक्यतो) तत्वांची पायमल्ली होणार नाही याची आपापल्या कुवतीप्रमाणे काळजी घ्यावी.