ज्यामुळे मान खाली घालायला लागत नाही तो अभिमान

ही व्याख्या चांगली आहे.

आईवडीलांनी स्वतः कष्टात दिवस काढून सरळ मार्गाने

हे उदाहरण तर फारच आवडले. पुष्कळशा गोष्टी लक्षात आल्या. मला माझ्या आईबाबांचे कौतुक वाटते, 'अभिमान' वाटत नाही हे खरेच, पण एकंदरित लोक अभिमान म्हणतात तेव्हा त्यांना नक्की काय वाटत असते त्याचा थोडा अंदाज आला.

नवा प्रश्न असा उद्भवला की देश, भाषा अशा एक व्यक्ती नसलेल्या गोष्टी, संकल्पना यांचा अभिमान लोकांना कसा काय वाटतो. 'देशाने' अमके केले असे म्हणताना देशातील काही लोकांनी ते केलेले असते. देशासाठी केलेले असू शकते. तर त्या लोकांचे कौतुक, अभिमान वाटणे समजण्यासारखे आहे. ते लोक दुसऱ्या कोणत्याही देशात असते तरी तसेच वागले असते. (उदा. सैनिक, खेळाडू!) मग याबाबतीत 'देशाचा' अभिमान का? 

भाषेने अमके केले असे म्हणता येईल का?