वरील दृष्टांत कथा आणि त्यावरील प्रतिसाद वाचून अजून एक दृष्टांत आठवला.
प्रा. के. वी. बेलसरे यांच्या पुस्तकात वाचल्याचे स्मरते. तो दृष्टांत ज्याप्रमाणे आठवतोय, तसा माझ्या शब्दांत लिहीत आहे.
आपले मन हे हौदाप्रमाणे आहे असे मानले तर तम-रज-सत्त्व या गुणाच्या तोट्यांतून त्यात पाणी (संस्कार ) भरले जात आहेत. प्रत्येक तोटीतून येणाऱ्या पाण्याचा रंग वेगवेगळा आहे. म्हणजे सत्त्व दुधी, रज सोनेरी आणि तम तांबडा (रंगांची निवड मी केलेली आहे.) तर आपण जर फक्त सत्त्वानेच हा हौद भरला (वरील उदाहरणात तुपाने बरणी भरली) तरी भगवंत दूरच आहे. त्यासाठी हौदातले पाणी रंगहीन स्वच्छ पाण्याने भरले गेले पाहिजे. भगवंत गुणातीत आहे. (आणि 'नाम' असे स्वच्छ पाणी हौदात भरते.)
--लिखाळ.