छायाताई, रोहिणीताई, मीराताई, जीवन जिज्ञासा-
धन्यवाद.
===
विडंबन तेवढे काही जमले असे वाटले नाही बुवा.
-कारकून
जमले असे वाटलेच आणि/किंवा आवडलेच पाहिजे असा आग्रह बिलकुल नाही. मूळ गाणे ऐकता ऐकता सहज पहिली ओळ सुचली. त्यावरून विडंबन करायचा प्रयत्न केला इतकेच. मात्रा सांभाळल्यामुळे मूळ गीताच्या चालीवर म्हणता येते असे वाटते. मात्रा सांभाळण्यासाठी अनेक बदल करावे लागले, हाच माझा या विडंबनातला धडा, असे म्हणता येईल. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
===
भोमेकाकांना कविता– मग ते विडंबन का असेना – झाली, ही आनंदाची बाब आहे.
ते दिलखुश हवे असे वाटते.
मूळ कविता दिसली नाही.
-चित्त
तुम्हाला आनंद झाला यातच सर्व आले.
शुद्धलेखनाचे लक्षात ठेवेन.
मूळ कविता प्रकाशित केली आहे. तुमचा प्रतिसाद पाहून परत एकदा प्रकाशित केली आहे. त्या कवितेची वाचने १६०+ दिसत आहेत. त्यामुळे इतरांना दिसत असावी असे वाटते.