मूळ लेखापेक्षासुद्धा त्यावरील चर्चा खूप मजेदार व उद्बोधक वाट्ली. एखादे रूपक वापरून मुद्दा मांडताना अनेक गृहीतके धरलेली असतात. कांच, लोणचे, गरम पाणी वगैरे दृष्य  आणि चित्त (लेखामध्ये देह म्हंटले आहे पण मला देह म्हणजे शरीर असा बोध होतो), अहंकार, हरिनाम वगैरे अदृष्य  गोष्टी  (चू.भू.द्या̱̱.घ्या.). या दोन्हीमध्ये साम्य आहे असे गृहीत धरले तर अदृष्य चित्ताच्या स्वच्छतेची क्रिया समजणे सोपे जाते एवढेच.  ती पटायलाच पाहिजे असे नाही.

तर्कशुद्ध विचार केला तर अनेक फाटे फुटू शकतात.  काचेची बरणी निदान कांही प्रयत्नाने स्वच्छ होईल तरी. पण कागदात कांद्याची भजी गुंडाळली तर त्याला लागलेला रंग आणि वास कसा निघणार?  कुणाला भजी आवडतील तर कुणाला शिरा आवडेल. बहुतेक लोकांना दोन्ही आवडतील पण वेगवेगळे खायला आवडेल. पण भजी शिऱ्याबरोबर खाल्ली तरी काय बिघडलं?

तुझे आहे तुजपाशी मध्ये सुद्धा शेवटी काकाजी आचार्यांना मनःशांती मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर रानांत जाऊन रहायला सांगतात, "माझ्याबरोबर शिकार करा" असे सांगत नाहीत. "हाय कंबख्त तूने पीही नही" म्हणतात तसेच पेलवत नाही एवढी भांग घेऊ नये हेही सांगतात.