वन्दे मातरम् दिन साजरा होत असतानाच हा बहुमोल भावानुवाद माझ्या वाचनात आला हे माझे भाग्यच!
कल्याणच्या शाळेच्या एक शिक्षिका , त्यांनी मला दूरध्वनीवरून ह्या गीताच्या मराठी अर्थाविषयी विचारले होते. मी गद्य अनुवाद केला होता. त्या अनुवादाला आपल्या ह्या भावानुवादाची जोड दिली आहे. सर्वांसमोर त्या शाळेत त्याचे वाचन केले जाईल. त्यासाठी आपली पूर्वपरवानगी माझ्याकडून घेतली गेली नाही.क्षमस्व. पण ह्या शाळेतील संबंधितांना ह्या गीताचा अर्थ जाणून घेण्याची तळमळ आहे असे मला जाणवले. म्हणून मी त्या शिक्षिकेला हा भावानुवाद सांगितला आहे.
घरीही मोठ्या आवाजात मूळ गीत व हा भावानुवाद म्हणून दाखवला. आनंद मिळवला आणि ज्यांनी मागितला त्यांना दिला. पुनश्च धन्यवाद.