काचेची बरणी निदान कांही प्रयत्नाने स्वच्छ होईल तरी. पण कागदात कांद्याची भजी गुंडाळली तर त्याला लागलेला रंग आणि वास कसा निघणार?

कागदाला लागलेला रंग आणि वास गेलाच पाहिजे, असा अट्टाहास का? नंतर शिरा खायचाय, त्याला भज्यांचा वास लागलेला नाही आवडत, तर द्या की फेकून जुना कागद, आणि घ्या की नवा - किंवा द्रोण घ्या एखादा, हवं तर! एकाच कागदात आधी भजी आणि नंतर शिरा खायचा आग्रह का?

कुणाला भजी आवडतील तर कुणाला शिरा आवडेल. बहुतेक लोकांना दोन्ही आवडतील पण वेगवेगळे खायला आवडेल.

हेच तर म्हणतोय!

पण भजी शिऱ्याबरोबर खाल्ली तरी काय बिघडलं?

आवडत असेल, तर काहीच बिघडलं नाही. फक्त ज्याला नाही आवडत, त्यानं भज्यांचा कागद deodorize करण्याचा प्रयत्न करू नये, दुसरा घ्यावा, एवढंच म्हणणं.

तुझे आहे तुजपाशी मध्ये सुद्धा शेवटी काकाजी आचार्यांना मनःशांती मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर रानांत जाऊन रहायला सांगतात, "माझ्याबरोबर शिकार करा" असे सांगत नाहीत.

अगदी हेच! दोघंही रानात जाऊ; तुम्ही तपस्या करा, मी शिकार करतो. तुम्हाला तपस्या आवडते, good for you, मला शिकार आवडते, good for me, दोघांनाही एकमेकांना वाईट म्हणण्याचं किंवा तुच्छ लेखण्याचं काहीच कारण नाही, ना की एकमेकांचे विचार/पद्धती एकमेकांवर लादण्याच. - Let us live and let live.

"हाय कंबख्त तूने पीही नही" म्हणतात तसेच पेलवत नाही एवढी भांग घेऊ नये हेही सांगतात.

अलबत्! "'तूने पीही नहीं' तर तुला काय कळणार हे ठीकच, आणि पेलवत नसेल तर भांग घेऊ नकोस हेही ठीकच. फक्त पेलवत नसेल तर त्यात दोष भांगेचा नाही, तुझ्या भांग पेलवण्याच्या क्षमतेच्या मर्यादेचा आहे, हे लक्षात घे, आणि त्याप्रमाणे वाग. पेलवत नसेल तर स्वतः घेऊ नकोस, पण पेलू शकणाऱ्याला किंवा खुद्द भांगेला वाईट म्हणू नकोस." यात विरोधाभास कुठे आला?