शरदरावांचा प्रतिसाद म्हणजे वस्तुस्थितीचे वास्तवकारी चित्रण होते, त्याला 'खोडसाळ' पणाचे रुप अजिबात नसावे अशी माझी समजुत आहे. तसे असल्यास...पुढे चालु..

 

राज्यकर्ते क्षत्रिय असले तर राज्य चालवणारे, कायदे करणारे, नियंत्रण ठेवणारे ब्राह्मणच होते. राज्यविस्तार, राज्यरक्षण यांची जबाबदारी क्षत्रियांवर असल्याने धर्म कांडाचा बागुलबुवा निर्माण करून, क्षत्रियांना हाताशी धरून त्यांच्या (उपस्थितीत आणि) अनुपस्थितीत राज्य सांभाळणारे ब्राहमणच खरे राज्यकर्ते होते.

असे जर असेल तर 'त्या' काळचे क्षत्रियांपेक्षां ब्राह्मण विद्वान होते हे आपोआपच सिध्द होतं, मग तुम्हाला नेमक काय म्हणावयाचे आहे?

अगदी रामायण- महाभारताची उदाहरणे घ्यायची झाली तरी विश्वामित्रांनी सांगितल्यावर यज्ञाचे रक्षण करणारे कुमार राम-लक्ष्मण आणि द्रोणाचार्यांच्या अपमानाचा सूड उगवणारे कुरू हे त्या त्या ब्राह्मणांचे बळ दाखवते. तेच चाणक्य आणि चंद्रगुप्ताच्या बाबत.

इतरांना 'आजच्या काळात या' असा उपदेश तुम्हीच केलाला असावा असे मला वाटते. मग तुम्ही ही आजच्या काळातली उदाहरणे दिली तर जरा जास्त संयुक्तिक होईल. ब्राह्मंणाच्या दारिद्र्याबद्द्लच का बोलल जात, ह्याच जास्त पटणार कारण असं देता येईल कि 'विद्वान परंतु दारिद्र्यी' अशी हि एकच पोटजात असावी.

इंग्रजांच्या काळात मात्र ब्राह्मणांचे वर्चस्व कमी झाले. त्यातून मंगल पांडे पासून दुसऱ्या बाजीरावा पर्यंत सर्वांनी येन केन प्रकारे आपला धर्म उचलून धरून आणि कर्मठ विचारांना कवटाळून राहिल्याने ब्रिटिशांच्या काळात मागासवर्गीयांचा स्तर थोडासा उंचावला, समाज जागृती, पाश्चात्य शिक्षण, समाजसुधारक यांनी समाजातील ब्राह्मणांचे वर्चस्व झुगारून दिले आणि कदाचित याचे पर्यवसान ब्राह्मण मोठ्या संख्येने दरिद्री होण्यात झाले.

कर्मठ विचारांना कवटाळुन राहिल्याने मागासवर्गीयांचा स्तर कसा उंचावले?? हे जरा अधिक स्पष्ट करुन सांगु शकताल काय?

इंग्रजांना ब्राह्मणाविषयी काय वाटत होते हे त्याच्याच श्ब्दात पहा..'भारतामध्ये इंग्रज साम्राज्याला कधी काळी काही 'दगा' झाला तर तो ब्राह्मंणाकडुनच संभवतो'(पुण्याचे'चित्पावन ब्राह्मंण' असा 'त्यांचा' उल्लेख आहे..)

स्वातंत्र्यानंतर ६० वर्ष उलटली आहेत

आजही 'ब्राह्मणेतर' जातींना बामणाची बरोबरी का साधता आली नाही??

ज्या ज्ञानसाधनेमुळे ब्राह्मणांची (जी काही झाली असेल ती) प्रगती झाली आहे, तो मार्ग तुडवण्याऐवजी ब्राह्मणांना बदडण्याशी का करतात हेच कळत नाही.

 

 

 

(ब्राह्मणांना उठसुठ शिव्या देण्याच नविनच प्रस्थ 'मनोगत'वर मुळ धरु लागलय ! कुठली 'अपप्रवृत्ती' जास्त बोकाळली कि 'विकृती' होते, हे जुनच सुत्र आहे. अशा  गोष्टीला वेळीच आवर घातला पाहिजे.)