श्री शरद कोर्डे यांच्यावर हल्ला चढवताना प्रियाली यानी मूळ प्रश्न अनुत्तरितच ठेवला आहे.
ब्राह्मण नेहमीच अल्पसंख्य होते आणि आहेत तरीही समाजावर त्यानी वर्चस्व गाजवले हे खरे आहे का?महाभारतात महत्त्वाच्या व्यक्ती श्रीकृष्ण,पांडव, कौरव हे सर्व क्षत्रिय किंवा आजच्या भाषेत ओ.बी. सी. (यादव)होते. द्रोणाचार्य खरोखरच दरिद्री होते नाहीतर अश्वत्थाम्याला दूध म्हणून पीठ घातलेले पाणी प्यावे लागले नसते. मग त्यावेळी कोणते ब्राह्मण वर्चस्व गाजवत होते?परशुरामाचे एकमेव उदाहरण डॉ. साळुंके देतात.पण एकटा परशुराम एवढ्या क्षत्रियाना भारी ठरणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
रामायणातही वसिष्ठ ब्राह्मण होते तर विश्वामित्र क्षत्रियच होते. आणि या दोघानी क्षत्रिय रामाला हाताशी धरून ब्राह्मण रावणाचा नाश केला असेल तर त्यानी ब्राह्मणाचे वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येणार नाही.
डॉ. साळुंखे यानी पुष्यमित्र शुंग या ब्राह्मणाने मौर्य साम्राज्य नाश केले असे म्हटले आहे पण चाणक्य या ब्राह्मणानेच चंद्रगुप्तास ते स्थापन करण्यास मदत केली होती हे ते विसरतात.
शिवाजी महाराजाना राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणानी नकार देण्याचा करंटेपणा दाखवला तरी गागाभट्ट या ब्राह्मणानेच त्याना राज्याभिषेक केला.शिवाजी महाराजाना विरोध करणाऱ्यात चंद्रराव मोरे यांच्यासारख्या क्षत्रियांचाही सहभाग होता.शिवाजी महाराजाना अष्टप्रधानमंडळात ब्राह्मणांची भरती करण्याची कुणी सक्ती केली नव्हती. किंवा छ. शाहू महाराजाना कोकणातून आलेल्या दरिद्री ब्राह्मणास पेशवा नेमण्याचे काहीच कारण नव्हते. हातात आलेली सत्ता ब्राह्मणानी नीट वापरली नाही हे जरी खरे असले तरी power makes the man corupt हे सर्वांच्या बाबतीत खरे आहे त्याला ब्राह्मण अपवाद ठरले नाहीत येवढेच !
आता डॉ. साळुंखे म्हणतात तसे ब्राह्मणाच्या गुलामीत इतर जाती आहेत का? सध्या राज्यकर्ते कोण आहेत ?या राज्यकर्त्याना मुख्य मंत्री म्हणून सुशीलकुमार शिन्दे सुद्धा चालत नाहीत. शालिनीताई पाटील म्हणतात (एकही ब्राह्मण मंत्री नसलेल्या)महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच हवा त्यावर श्री. साळुंके,शिवश्री आणि प्रियाली यानाही काय म्हणायचे आहे ?यालाच ब्राह्मणांची गुलामगिरी म्हणायचे का? थोडक्यात डॉ. साळुंके यांचे आवाहन ब्राह्मणांची (नसलेली)गुलामगिरी सोडा आणि आम्हा मराठ्यांची गुलामी पत्करा असाच दिसतो.