त्याचकाळात हे काही न करता केवळ विद्याभ्यास/अध्ययन करणारेही ब्राह्मण होते.

नक्कीच. पण त्यांना राज्याश्रय, लोकाश्रय होता. इतर मागास जाती प्रमाणे त्यांची स्थिती नसावी असे म्हणणार नाही परंतु प्रमाण कमी असावे. एकंदरीत ब्राह्मणात ब्रह्म अंश असल्याने त्याला दुखवण्याचे प्रयत्न कमीच असावेत. (अथवा ते झाल्यास ब्राह्मण जातीतूनच अधिक होत असावेत.)

या उदाहरणात विश्वामित्रांनी ......असे वाटते.

नक्कीच. मलाही असे म्हणायचे नाही की क्षत्रिय ब्राह्मणांच्या हातातील बाहुले होते. फक्त ब्राह्मण दरीद्री, तेजहीन नव्हते. विश्वामित्रांनी एकापेक्षा अधिक वेळाही राम किंवा तत्कालिन राजांची मदत मागितली असती तर त्यांना ती क्षत्रियांनी देऊ केली असती. सांगायचा मुद्दा हाच की क्षत्रियांच्या समवेत ब्राह्मणही सबळ होते. स्वतः लढून नसले तरी त्यांचे गुरू बनून इ. त्यात काही वाईट आहे हे दर्शवायचे नाही. उठसूट ब्राह्मणांनी आम्ही दरीद्री असं म्हणायची गरज नाही. आश्रमांचे पोशिंदे नक्कीच भिकारी नव्हते.

त्यातून श्रीमंत-गरीब हे प्रत्येक जातीत असतात. राजा, सेनापती सारखे क्षत्रिय श्रीमंत असले म्हणजे भालदार चोपदार श्रीमंत होते असं थोडच आहे. तेव्हा सगळे ब्राह्मण श्रीमंत नव्हते आणि सगळे दरीद्रीही नव्हते.

दरिद्री असण्याचे मूळ अर्थप्राप्तीचे कोणतेही साधन न असण्यामध्ये आहे असे वाटते. त्यांनी अर्थार्जनासाठी काही न करता (शेती/व्यापार इ.), इतर लोकांच्या साहाय्यावर जगणे अपेक्षित होते. त्यामुळे बहुसंख्य ब्राह्मण दरिद्री असणे शक्य असावे. त्यामुळे ही केवळ सुरस कथा/कवितांमधील कल्पना होती असे म्हणता येणार नाही.

असहमत. कारणे दिलेली आहेत. ज्यांच्या अंगी गुण नव्हते काही वेगळे करता येत नव्हते किंवा पूर्वापार चालत आलेली भिक्षुकी सोडून वेगळे काही करण्यास तयार नव्हते ते लोकांच्या सहाय्यावर राहून गरीब राहीले, असं फारतर म्हणता येईल. अन्यथा, पेशवाईच्या काळात क्षात्र धर्म स्वीकारणारे ब्राह्मण आहेत. (हे एक लहान उदाहरण झाले)

काहींनी देवधर्माच्या नावावर अन्याय्य प्रस्थ माजवले होते हे सगळे जरी खरे असले तरी सगळेच ब्राह्मण तसे होते असे म्हणता येणार नाही. याचे सामान्यीकरण (जनरायलेझन) करणे चुकीचे ठरेल असे वाटते. (याच न्यायाने, काही चांगली उदाहरणे घेऊन अति-उदात्तीकरण करणेही चुकीचे आहे.)

असे माझेही म्हणणे नाही. शिवश्रींच्या लेखांनाही दुजोरा नाही. पण चुकीच्या मुद्द्यांचे खंडन चुकीच्या वाक्यांनी करू नये. एवढंच कोर्ड्यांना सांगायचे होते.

आत्मपरीक्षणाची गरज सर्वांना (ब्राह्मण असण्याचा अवास्तव अभिमान असणाऱ्यांना, सरसकट सर्व ब्राह्मणांवर केवळ टीकाच करणाऱ्यांना आणि यापैकी कोणतीही टोकाची भूमिका न घेणाऱ्यांनाही) आहे असे वाटते.

मलाही असेच वाटते आणि प्रत्येकाने दुसऱ्याला उपदेश करण्यापूर्वी स्वतःला चाचपून पहावे हे ही सांगावेसे वाटते. (तुम्हाला नाही शशांक, सर्वसामान्य वाक्य आहे.)