माफ करा. आपण माझा प्रतिसाद बरोबर वाचला नाही असे दिसते. नाहीतर साळुंखे, शिवश्री यांच्याबरोबर माझे नाव जोडले नसते आणि मी ब्राह्मणांवर टीका करते आहे हा जावईशोधही लावला नसता.
मी तो लेख वाचला ही नाही. तो वाचण्याची गरजही नाही. कोर्ड्यांच्या खोडसाळ वाक्याला मी प्रतिसाद दिला. त्याला स्पष्टपणे "विषयांतर" म्हटलेले आपण वाचलेले दिसत नाही. की चूक असले तरी विरोधाला विरोध करायचे हे एक धोरण आहे?
उगीच काहीतरी नसलेले मला का चिकटवता आहात? माझा प्रतिसाद फक्त कोर्ड्यांच्या 'खोडसाळ' विधानाला होता. तो कवटाळून राहून डोळ्यावर झापडं घेऊन बसायच असेल तर माझं काय जात? पण माझं नाव का साळुंखे आणि शिवश्रींबरोबर. त्यांच्या चर्चेला प्रतिसाद दिला म्हणून??