साळुंख्याच्या बाबतीत माझे नाव तिथे फुकट जोडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही पण इतर काही प्रश्नांची उत्तरे...
द्रोणाचार्य खरोखरच दरिद्री होते नाहीतर अश्वत्थाम्याला दूध म्हणून पीठ घातलेले पाणी प्यावे लागले नसते. मग त्यावेळी कोणते ब्राह्मण वर्चस्व गाजवत होते?
द्रोणाचार्य दरीद्री राहिले का? पूर्वाधाचे उदाहरण दिले पण उत्तरार्धाबद्दल काय? त्यांचे गुण ओळखून त्यांना राज्याश्रय मिळाला. त्यांच्या शिष्यांनी गुरूदक्षिणे साठी युद्ध लढून द्रुपदाचा पराभव केला. स्वतः सबळ व्हायची प्रत्येक ठिकाणी गरज नसते.
हेच वसिष्ठ, विश्वामित्र, कृपाचार्य इ. बाबतही म्हणता येईल. तेंव्हा ब्राह्मण=दरीद्री हे खोडसाळ विधान आहे.
रामायणातही वसिष्ठ ब्राह्मण होते तर विश्वामित्र क्षत्रियच होते. आणि या दोघानी क्षत्रिय रामाला हाताशी धरून ब्राह्मण रावणाचा नाश केला असेल तर त्यानी ब्राह्मणाचे वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येणार नाही.
पण विश्वामित्रांना ब्रह्मतेज प्राप्त होते. ते क्षत्रिय राहिले नाहीत. याला ब्राह्मणांचे वर्चस्व का नाही म्हणता येणार? गुरुस्थानी असलेल्या विश्वामित्रांनी दशरथाकडे मुलांना घेऊन जातो ही केलेली अधिकाराची मागणी नाही का?
शिवाजी महाराजाना अष्टप्रधानमंडळात ब्राह्मणांची भरती करण्याची कुणी सक्ती केली नव्हती. किंवा छ. शाहू महाराजाना कोकणातून आलेल्या दरिद्री ब्राह्मणास पेशवा नेमण्याचे काहीच कारण नव्हते.
का बुवा? ब्राह्मण विद्वान होते. त्यांना अनेक विद्या, गणित, लेखन कला अवगत होत्या म्हणूनच हा राज्याश्रय मिळाला ना. की आणले उचलून कोकणातून चार लोक. आणि ते जन्माने दरीद्री असले तरी कर्माने दरीद्री राहिले का?
माफ करा मला एकंदरीत आपला प्रतिसाद biased वाटतो. जर ज्ञानार्जन हे ब्राह्मणांपुरते मर्यादीत होते तर इतर कुणाला शोधून आणणार होते शिवाजी महाराज आणि शाहू महाराज? मृतांची वासलात लावणाऱ्या मागासवर्गियांना की काय?