भारतीय रेल्वेच्या या कायापालटांतून/मागे/निमित्याने जाणवलेले हे काही महत्वाचे मुद्दे -
"गायीचं पूर्ण दूध पिळून काढलं नाही, तर गायीच्या आरोग्याला धोका असतो." कुठल्याही आस्थापनेच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून घेतला नाही, तर ती आस्थापनाही बुडीतखात्यात जाते. (वैद्य प्रतिसाद!)
''हमरी मैया कहती थी का भैंसपे काबू पाना हो तो उसके सिंग पकडो, पूंछ नाही" लालूंचं म्हणणं की रेल्वेतून पैसा मिळवायचा असेल तर मालवाहतूकीतून मिळवावा प्रवासीवाहतूकीतून नव्हे. (साती प्रतिसाद!)
रेल्वेच्या प्रशासनाबाबत लालूंनी अधिकाऱ्यांवर भरवसा ठेवला. त्यांनी केलेल्या सूचना अमलात आणल्या. व्यवस्थापनातून राजकारण बाजूला काढल्यास लाभदायक परिणाम दिसू लागणे अशक्य नाही.
हे यश कर्तृत्ववान आणि कल्पक अधिकाऱ्यांचे आहे. विविध देशी-परदेशी कंपन्यांच्या यशामध्ये अनेकानेक भारतीय आपल्या कष्टांनी आणि क्षमतेने भर घालत आहेत. काही बुद्धिमानांनी IAS किंवा तत्सम मार्ग स्वीकारला. एकूणच संधी मिळाल्यास सोने करून दाखविण्याची क्षमता जागोजागी आहे. येत्या दिवसांत त्याला देशाविदेशात वाव मिळो ही अपेक्षा. रेल्वे-कायापालट हा एक अपवाद न ठरो ही आशा.
ह्याच लालूंनी बिहार घोर अराजकात का लोटला? हा स्वाभाविक प्रश्न! माझ्या मते बिहारच्या राजकारणात लालू हे जातीपातीच्या आणि गुंडागर्दीच्या जोरावर सत्तेत आले. त्यामुळे ह्या घटकांना बाजूस राखणे तर सोडाच पण पोसणे हेच त्यांचे परम कर्तव्य झाले... जनतेची राखरांगोळी झाली.
रेल्वे प्रशासनाबाबत अधिकाऱ्यांचे यश आहे हे मान्य केले तरीही... माझा एक मित्र नेहमी म्हणतो त्याप्रमाणे making good decisions is an art as much as it is a science. लालूंनी रेल्वे संघटनेमध्ये योग्य निर्णयांना राजकीय समर्थन मिळवून देऊन आणि संपूर्ण ताकद अधिकाऱ्यांमागे उभी करून स्वतःचे काम decently केलेले दिसते आहे.