बेळगाव महानगर पालीकेने तो ठराव खोडसाळपणे पार केला नव्हता. तसा ठराव पास करणे हा पोरखेळ नाही. त्याला खोडसाळ म्हणनार्याना बेळगाव प्रश्नाचे ज्ञानच नाही असे म्हणावे लागेल. तसा ठराव पास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पुर्वीच्या ठरावांना फक्त नकार दिला जायचा. राज्य सरकार कोणताही ठराव नकारु शकते, पण महानगरपालीका बरखास्त करु शकत नाही. कर्नाटक सरकारने बरखास्तीची जी कारणे दिली आहेत, त्याच्यात त्या ठरावाचे नावही नाही.  मुंबइ गुजरात मद्ये असती तर, काश्मीर पाकीस्तानात असते तर, अश्या विषयावर चर्चा करण्यात कांहीच अर्थ नाही.  बेळगाव आणि नंदुरबार ची तुलना करण्यात काय तथ्य आहे, ते समजले नाही. त्याच्यापेक्षा खालील योग्य विषय आहेतः कारवार, बिदर, डांग महाराष्ट्रात नाहीत?   गोवा महाराष्ट्रात का नाही?  एका गालावर मार घेवून दुसरा गाल पूढे करन्यालाच "विशाल द्रुष्टिकोन" म्हनायचा का?