तुमची नंदुरबार, माटुंगा, गोरेगाव, दामू नगर (कांदिवली पूर्व) वगैरे विषयी चर्चा वाचल्यावर तुम्हाला काय सांगायचे आहे, तेच कळत नाही आहे. माझ्या मते तुम्ही गुजरात मद्ये राहिल्यामुळे बेळगांव विषयी ज्ञान नसेल. त्याला कांही हरकत नाही. पण मुळ विषयाला बगल देवु नये. भारत सरकार कोणत्याही राज्याची हद्द ठरवू शकते. देश्याची हद्द दुसरे कोणी ठरवू शकत नाहीत. काश्मिर भारातात आहे, त्यामुळे नागपाड्याविषयी बोलण्याची गरज नाही. प्रत्येक शहरात एकाधी गल्ली मिळेल कि तेथे बाहेरील लोक राहतात. याचा अर्थ ति गल्ली दुसर्या राज्याला द्यायची असा होत नाही. त्या गावात किंवा शहरात बहुमत कोणाचे आहे ते पाहिले जाते. शिवाय भौगोलीक स्थान सुद्दा महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, बिहार मधिल एकाध्या खेड्यात मराठी बहुमत असेल तर ते महराष्ट्रात सामील करता येणार नाही.
गोपाळ