पण समजा ही भुमिका संजीवकुमार ला मिळाली असती तर त्याने देखिल तीचे सोनेच केले असते असे मला वाटते.
सहमत.
नसिरुद्दिन शाहचा गालिब पाहिल्यावर खरा गालिब असाच असला पाहिजे असे वाटते. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मिर्जा गालिब ही मालिका तबकड्यांच्या स्वरूपात उपलब्ध झाली आहे. गालिबची असामान्य प्रतिभा, त्याची संवेदनशीलता, त्याचा अहंकार.... सगळे नसिरुद्दिनने पडद्यावर जिवंत केले आहे. तशी सगळी मालिकाच विसरता न येण्याजोगी, पण त्यातला एक प्रसंग मुद्दाम लिहावासा वाटतो. कर्जबाजारी गालिब जुगार खेळत असताना रस्त्यावरचा एक फकीर 'कोई दिन गर जिंदगानी और है' ही गालिबचीच गजल म्हणत फिरत असतो. ते ऐकून गालिब मनोमन खूष होतो आणि आपल्याजवळची सगळी नाणी त्या फकिराला देऊन टाकतो. हे मनातून खूष होणे नसिरुद्दिनने पडद्यावर असे दाखवले आहे की ज्याचा जवाब नाही!
अशीच एक सिच्युएशन 'मिर्जा गालिब' चित्रपटात पाहिल्याचे स्मरते. पण कुठे नसिरुद्दिन आणि कुठे भारतभूषण!