सकर्मक क्रियापदे : उदा. खाणे

वर्तमानकाळ

राम आंबा खातो - राम चिंच खातो - राम बोर खातो
सीता आंबा खाते - सीता चिंच खाते - सीता बोर खाते
पाखरू आंबा खाते - पाखरू चिंच खाते - पाखरू बोर खाते

राम आंबे खातो - राम चिंचा खातो - राम बोरे खातो
सीता आंबे खाते - सीता चिंचा खाते - सीता बोरे खाते
पाखरू आंबे खाते - पाखरू चिंचा खाते - पाखरू बोरे खाते

राम आणि लक्ष्मण आंबा खातात - राम आणि लक्ष्मण चिंच खातात - राम आणि लक्ष्मण बोर खातात
सीता आणि ऊर्मिला आंबा खातात - राम आणि लक्ष्मण चिंच खातात - सीता आणि ऊर्मिला बोर खातात
पाखरे आंबा खातात - पाखरे चिंच खातात - पाखरे बोर खातात

राम आणि लक्ष्मण आंबे खातात - राम आणि लक्ष्मण चिंचा खातात - राम आणि लक्ष्मण बोरे खातात
सीता आणि ऊर्मिला आंबे खातात - राम आणि लक्ष्मण चिंचा खातात - सीता आणि ऊर्मिला बोरे खातात
पाखरे आंबे खातात - पाखरे चिंचा खातात - पाखरे बोरे खातात

भूतकाळ

रामाने आंबा खाल्ला - रामाने चिंच खाल्ली -रामाने बोर खाल्ले
सीतेने आंबा खाल्ला - सीतेने चिंच खाल्ली - सीतेने बोर खाल्ले
पाखराने आंबा खाल्ला - पाखराने चिंच खाल्ली - पाखराने बोर खाल्ले

रामाने आंबे खाल्ले- रामाने चिंचा खाल्ल्या -रामाने बोरे खाल्ली
सीतेने आंबे खाल्ले - सीतेने चिंचा खाल्ल्या - सीतेने बोरे खाल्ली
पाखराने आंबे खाल्ले - पाखराने चिंचा खाल्ल्या - पाखराने बोरे खाल्ली

राम आणि लक्ष्मण ह्यांनी आंबा खाल्ला - राम आणि लक्षमण ह्यांनी चिंच खाल्ली - राम आणि लक्ष्मण ह्यांनी बोर खाल्ले
सीता आणि ऊर्मिला ह्यांनी आंबा खाल्ला - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी चिंच खाल्ली - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी बोर खाल्ले
पाखरांनी आंबा खाल्ला - पाखरांनी चिंच खाल्ली - पाखरांनी बोर खाल्ले

राम आणि लक्ष्मण ह्यांनी आंबे खाल्ले - राम आणि लक्षमण ह्यांनी चिंचा खाल्ल्या - राम आणि लक्ष्मण ह्यांनी बोरे खाल्ली
सीता आणि ऊर्मिला ह्यांनी आंबे खाल्ले - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी चिंचा खाल्ल्या - सीता आणि ऊर्मिला ह्यांनी बोरे खाल्ली
पाखरांनी आंबे खाल्ले - पाखरांनी चिंचा खाल्ल्या - पाखरांनी बोरे खाल्ली.

भविष्यकाळ

राम आंबा खाईल - राम चिंच खाईल - राम बोर खाईल
सीता आंबा खाईल - सीता चिंच खाईल - सीता बोर खाईल
पाखरू आंबा खाईल - पाखरू चिंच खाईल - पाखरू बोर खाईल

राम आंबे खाईल - राम चिंचा खाईल - राम बोरे खाईल
सीता आंबे खाईल - सीता चिंचा खाईल - सीता बोरे खाईल
पाखरू आंबे खाईल - पाखरू चिंचा खाईल - पाखरू बोरे खाईल

राम आणि लक्ष्मण आंबा खातील - राम आणि लक्ष्मण चिंच खातील - राम आणि लक्ष्मण बोर खातील
सीता आणि ऊर्मिला आंबा खातील - सीता आणि ऊर्मिला चिंच खातील - सीता आणि ऊर्मिला बोर खातील
पाखरे आंबा खातील - पाखरे चिंच खातील - पाखरे बोर खातील

राम आणि लक्ष्मण आंबे खातील - राम आणि लक्ष्मण चिंचा खातील - राम आणि लक्ष्मण बोरे खातील
सीता आणि ऊर्मिला आंबे खातील - सीता आणि ऊर्मिला चिंचा खातील - सीता आणि ऊर्मिला बोरे खातील
पाखरे आंबे खातील - पाखरे चिंचा खातील - पाखरे बोरे खातील

इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉईस प्रमाणे -

आंबा (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ला ( जातो/गेला/जाईल)
चिंच (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ली ( जाते/गेली/जाईल)
बोर (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ले ( जाते/गेले/जाईल)

आंबे (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ले ( जातात/गेले/जातील)
चिंचा (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ल्या ( जातात/गेल्या/जातील)
बोरे (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ली ( जातात/गेली/जातील)

आणखी गोडी असेल तर कळवावे.

(चुका दिसल्यास कृपया निदर्शनास आणून द्याव्यात)