मृदुला आणि प्रियाली यांनी मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. एक मुद्दा मांडावासा वाटतो.
दुसऱ्या महायुद्धातील नाझींच्या "आर्य वंश श्रेष्ठ" या अट्टाहासामागे तथाकथित अटलांटिस संस्कृती होती. कल्पनाविलास कुठल्या थराला जाउ शकतो याचे हे टोकाचे उदाहरण.
अवांतर ः मानववंशशास्त्र; भाषा, संस्कृती यांची उत्क्रांती हे विषय इतके मनोरंजक आहेत की यात आणखी कल्पनाविलासाची गरज आहे असे वाटत नाही.
हॅम्लेट