मनोगत व इतरत्र मराठी व्याकरण चर्चा नित्य नियमाने होते.पण हे सर्व मोती विखुरलेल्या स्वरूपात सर्वत्र सांडलेले आहेत असे काहीसे वाटते.बऱ्याचदा विषयांतर झालेली चर्चा गाळत गाळत जावे लागते. कधी मोती मिळतात तर कधी चाकाचा शोध पुन्हा लावण्याचा प्रयोग चालू असतो.

हे मोती ओवून त्यांची एखादी सुंदर माळ बनवली तर काय हरकत आहे? बहुधा माझा मुद्दा सर्वांना पटेल अशी आशा आहे. मनोगत प्रमाणे मोकळी चर्चा तसेच नवीन  मूळ लेख लिहिता येत नाहीत हे खरे, इतर उणीवा ही मान्य. पण व्याकरणातील प्रत्येक शब्दाची व्याख्या देत जाणे विकिपीडियात सोपे होते.

मनोगतवरून  विकिपीडियात कॉपी पेस्ट करताना विकिकरांना कॉपीराइट थोडे अस्वस्थ करत असतात त्या मुळे आपल्यातील चांगल्या व्याकरणच्या दर्दींनी  विकिपीडियात स्वतःहून थोडे थोडे योगदान दिले तर नक्कीच सर्वांना फायदा होईल असे वाटते.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

जाताजाता  हा दुवा http://www.manogat.com/node/5872 दांडेकरसरां करीता.

क.लो.न.वि.