भोमेकाका,
विडंबन फार आवडले. वाचताना मजा आली.
घास नको मज कुठलाही अन् घोट नको आहे
जेवण कुठले? मुळात मजला भूक नको आहे
ह्या घासांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न गिळावे त्यांना, त्यांनी गिळू नये मजला
मस्त....
आता कुठल्या दिलखुष गप्पा उष्ट्या हातांनी
आता नाही भूकही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने खानावळीचे खाडे मी करतो.. अतिशय सुंदर..व्वाहवा
(येथे राखण करीत बसती येथे सदैव ढेक्रा या येथे राखण करीत बसती येथे सदैव या ढेक्रा असे केले तर चालीत म्हणायला अजून मजा येईल असे वाटले. वृत्तात वगैरे बसते का नाही त्याची कल्पना नाही.)
शुभेच्छा,
--लिखाळ.