सामान्यतः जुने संगणक (आणि तत्सम साहित्य) खूप हळूहळू काम करतात, किंवा केवळ जुने झालेत या कारणास्तव (कंपन्यांतून आणि/किंवा घरगुती) उपयोगातून काढून टाकले जातात. या प्रकारचे संगणक, संगणकाचे प्राथमिक प्रकारचे शिक्षण देण्यासाठी वापरता येऊ शकतात. अशा संगणकांचे संकलन आणि समाजसेवी संस्थांना आणि/किंवा खेड्यापाड्यातल्या शाळांना निःशुल्क किंवा नाममात्र शुल्क (प्रवासखर्च/हाताळणी) घेऊन देता येऊ शकतात.
अशा उपक्रमाच्या शोधात आमचा जुना (पेंटियम १) बरेच दिवस घरी पडून होता. या प्रकारचा उपक्रम सापडला नाही.