मी रधिका,
आपले स्पष्टीकरण, त्यात मांडलेले विचार आवडले, पटले.
धन्यवाद
एक कविता म्हणून वरील रचना शब्दबंबाळ वाटली. शिवाय मुक्तक म्हणजे छंदमुक्त रचना नव्हे असे काहीसे प्रवासीगुरुजींनी सांगितल्याचे आठवते. स्पष्ट मत दिले, राग नसावा.
स्पष्टमत मांडल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. मी कविता/ रचना करीत नाही. त्यामुळे रचनांतील बारकावे मला माहीत नाहीत. वरील रचना छंदबद्ध नसल्याने त्याचा वर्ग काय करावा ते समजले नाही आणि त्याचमुळे ते मुक्तक असावे असे 'मुक्तक' या शब्दावरून वाटले. चूक झाली असेल तर क्षमा करा.
बाकी ऊर्मीतून निर्माण झालेले शब्द आणि आजचे शब्द यांत जमीन अस्मानाचा फरक असावा असे वाटते. अशा शब्दांचे मूळ शोधणे खरंच फार रंजक असते.
(मी आपल्या स्पष्टीकरणाचा आपल्याला अभिप्रेत तोच अर्थ घेतला असेल अशी आशा आहे.)
होय आपले म्हणणे योग्यच आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नाना,
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
--लिखाळ.