याच धर्तीवर दुचाकी (सायकल) नाममात्र किमतीला आजूबाजूच्या गरीब घरात देऊन टाकल्या आहेत.

स्वचलित दुचाकी (एम ८०) (खुल्या बाजारात चांगली किंमत येईल हे माहीत असूनसुद्धा) नाममात्र किमतीला एका माहितीतल्या (पण नात्यात नसलेल्या) व्यक्तीला विकली आहे.

कुठलीही गोष्ट फुकट देण्यास माझा तत्त्वतः विरोध आहे. फुकट गोष्टींची किंमत नसते असे वाटते. म्हणून नाममात्र किंमत घ्यावी असे वाटते. तसेच विकत घेणाऱ्यालाही आपण कोणाच्या उपकारावर वस्तू वापरतो आहोत असे वाटत नसावे असे वाटते.