जुने संगणक देण्याचा प्रकल्प कितीही चांगला असला तरी तो घरातल्या घरात झाला तर उत्तम... म्हणजे, बाहेरून (परदेशातून -अमेरिका वगैरे मधून) असल्या गोष्टी करणाऱ्या संघटनांकडून शक्यतो घेऊ नये. बऱ्याचदा स्थानिक कायद्यांमुळे त्यांना अशा गोष्टींची विल्हेवाट लावणे अवघड असते म्हणून "दान" देण्याच्या नावाखाली "भाकड गायी" देतात. अशा गोष्टींमध्ये शिसे वगैरेपण खूप असते आणि ते शेवटी (विल्हेवाट नीट न लावल्यास) पाण्यात, वनस्पतींमध्ये वगैरे जाऊन आपल्याच तब्यतीला बाधा आणू शकते.