मला असे वाटते की सनईच्या सुरांनी आणलेली बंधने, यातून कवीला सामान्य माणसाला त्याचा संसार हा चाकोरीबद्ध आणि त्यामुळेच बंधनकारक वाटू शकतो, असे सुचवायचे असावे. सनईच्या सुरांच्या साक्षीने एकदा का तुमचा संसारात प्रवेश झाला, की मुलाबाळांचे संगोपन (अभ्यास, खाणेपिणे, आरोग्य इ.), पत्नीच्या आशाआकांक्षा, स्वप्ने यांची ही बंधने असावीत. या बेड्यांत एकदा अडकलो की आपण स्वतःसाठी कमीच ज़गतो, हे यातून अभिप्रेत असावे. यातून कवीला एकनिष्ठ असण्याविषयी प्रतिकूल भाष्य करायचे आहे, असे मला वाटत नाही. चू. भू. द्या. घ्या.
कविता छान आहे. सामान्यांच्या वर्मावर बोट ठेवणारी वगैरे (चावून चोथा झालेले) म्हणावेसे वाटत नाही. पण खूप आवडली.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा