हातावरती नसोत रेषा असोत रेषा
नशीब माझे लिहायचे सामान दे

किती वेदना सोसायाच्या लाजिरवाण्या?
शेवट आला आता तरी सन्मान दे

हे विशेष आवडले.

शेवटही चांगला आहे. पण शेवटच्या द्विपदीतून काय सांगायचे आहे, याचा मला नीट उलगडा झाला नाही. त्याबाबत अधिक स्पष्टीकरण मिळाल्यास आनंद वाटेल. या द्विपदीचा मी लावलेला अर्थ पुढीलप्रमाणेः

सागराचे खारे पाणी इतरांची तहान भागवण्यासाठी कुचकामी ठरते. म्हणजे सागराकडे असलेली ही संपत्ती निरुपयोगी आहे. त्याला बिचाऱ्याला याची ज़ाणीवही नाही. ज़र त्यालाही तहान लागली, तर कदाचित त्याला स्वतःच्या फ़ोलपणाची ज़ाणीव होईल. सागराप्रमाणेच आपल्या भोवती असणारी काही माणसे ज्यांना स्वतःकडील समृद्धीच्या फ़ोलपणाची कल्पना नसते, उगीचच आपला बडेजाव मिरवू पाहतात. अशा लोकांना ती ज़ाणीव करून देण्याची प्रार्थना कवयित्री करीत आहे. चू. भू. द्या. घ्या.

कविता गझलेच्या अंगाने ज़ाते आहे. तसा प्रयत्न असल्यास निश्चितच स्तुत्य आहे.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.