कृपया यात सद्यस्थितीवरून (जर लिहिले तर) लिहा, शिळ्या कढीला ऊत नको!

नामदेवराव,

आपल्या सूचनेप्रमाणे सद्यस्थितीतील दोन उदाहरणे देत आहे. त्यावरून ठरवूया गांधीवाद/अहिंसा कालबाह्य झाली का ते!

एक. हिज़्बुलाने अपहरण केलेले आपले दोन सैनिक सोडवण्यासाठी इस्त्रायलने लेबेनॉनवर हल्ला केला. महिन्याहून अधिक काळ चाललेल्या ह्या युद्धात सुमारे दीड हजार माणसे (बहुतांश निरपराध नागरिक) ठार झाले. सद्यस्थिती ? इस्त्रायलला आपले ते दोन सैनिक मिळाले तर नाहीतच उलट शत्रसंधीची नामुष्की ओढवली. आता ते सैनिक सोडविण्यासाठी इस्त्रायलपुढे इज़्बुलासमवेत वाटाघाटी करण्याशिवाय तरणोपाय नाही.

दोन. नोकरशाहीच्या दडपणापुढे झुकून मनमोहन सिंग सरकारने "माहिती अधिकार" कायद्यात सुधारणा करण्याचा घाट घातला. परंतु अण्णा हजारेंच्या आमरण उपोषणामुळे सरकारला अखेर माघार घ्यावी लागली.

आता ७ सप्टेंबरची नसलेली जन्मशताब्दी आठविणाऱ्या सरकारला ही ११ सप्टेंबरची असलेली जन्मशताब्दी का आठवू नये हा वेगळा विषय आहे !!