आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
वाचता वाचता मनात आलेली एक छोटीशी शंका विचारीत आहे. वसाहत म्हणजे वस्ती असा एक रूढ अर्थ आहे तसेच कॉलनी या अर्थाने सुद्धा तो वापरला जातो. त्यातील कुठला अर्थ मथळ्यामध्ये अभिप्रेत आहे?
मलाही हाच प्रश्न पडला होता पण मग वाटलं की 'भारत; ब्रिटीशांची वसाहत' (colony) या शब्दावरून आपण वसाहत सारख्या साध्या शब्दाला वेगळा अर्थ लावतो आहोत.
इथे मी तो शब्द केवळ वस्ती म्हणून वापरला आहे.
परंतु तेथील राज्यकर्ते किंवा जनता कधी भारतामधील राजाच्या अंमलाखाली होती कां? सध्या तरी कांबोडियासारख्या देशात प्रामुख्याने मंगोलवंशीय लोक राहतात. प्राचीन काळात कधी भारतीय आर्य किंवा द्रविड लोकांनी मोठ्या संख्येने तिकडे जाऊन वस्ती केली होती कां?
नाही. भारतामधील राजाच्या अंमलाखाली नव्हती. व्यापार, देवाण घेवाण मात्र चालत असे. स्थलांतरही शक्य आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात एखाद्या जन समुदायाने स्थलांतर केल्याचे दाखले नाहीत.