एकदम आवडले. सगळे डोळ्यासमोर उभे राहिले. चिन्यांना हिंदी चित्रपटातील नाच-गाण्यांचे एकदम आश्चर्य वाटले असेल ना ?

टिकलीवरून आठवले. आमच्या कचेरीतले जपान्यांना माझे लग्न झाले आहे हे कळल्यावर आश्चर्य वाटले कारण माझी टिकली केवळ लाल रंगाची नसून त्यात काळा रंगही होता. आणि त्यांच्या माहितीप्रमाणे कुमारिका काळी टिकली लावतात तर लाल टिकली फक्त लग्न झालेल्या मुली/बायक लावतात. आता त्यांना काय सांगणार आजकाल चित्र-विचित्र आकारांची आणि रंगांची टिकल्यांची कशी 'फॅशन' आहे ते !!!