वंदे मातरम् हे गीत काय उद्देशाने लिहिले वा कुणी म्हणावे वा म्हटले पाहिजे हे सर्व क्षणभर बाजूला ठेऊ. आपण (म्हणजे तुम्ही) एका देशात जन्म घेतलात आणि दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेणार अशांसाठी हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. (का सोनियाजींनी ह्या गीताला महत्त्व कां द्यावे असा between the lines विचारावयाचा उद्देश असल्यास माहित नाही, पण त्यांना नागरिक सोडून आणखी एक role आहे हे विसरता येणार नाही, असो). ह्या गीतात 'भारत देश' असा कुठे स्पष्ट उल्लेख नाही. गीतेतल्या काही खालील ओळी पाहता हे गीत धरणी मातेला (पृथ्वीला देवता दर्जा देणाऱ्यांसाठी) उद्देशून आहे असेही म्हणता येईल.
तुमि विद्या तुमि धर्म , तुमि हृदि तुमि मर्म , त्वं हि प्राणाः शरिरे, बाहु मे तुमि मा शक्ति , हृदय तुमि मा भक्ति, त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी, कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यायिनी, नमामि त्वां ....
गीत लिहिणाऱ्याने हे गीत आपण जन्म घेतलेल्या मातृभूमीला उद्देशून म्हटले आहे एव्हढेच मी जाणतो. आता माझा एक प्रश्न. कोणालाही उत्तर देऊ नका. आपल्या मनालाच त्याचे उत्तर द्या आणि मग आपणास उद्भवलेल्या शंकेची तुम्हालाच उत्तर सापडेल.
" अर्थ जाणून आपण हे गीत कोणाच्या आदरा प्रित्यर्थ म्हणावे ? "