जसं प्रत्येक रोगावर एकच उपाय नसतो, तसंच प्रत्येक परिस्थितीला एकाच प्रकारे हाताळता येत नाही.
जिथे आपलं म्हणणं बरोबर आहे तरीही समोरचा असमंजसपणा दाखवतो आहे किंवा आक्रस्ताळेपणा करतोय तेथे समोरच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आक्रमक होणे/आवाज चढवणे आवश्यक ठरते.
पण कधी कधी आपले म्हणणे बरोबर असूनदेखिल केवळ आपले काम करुन घ्यायचे आहे म्हणून गप्प बसावे लागते. सरकारी कार्यालयात हा अनुभव हमखास येतो!
त्यामुळे 'आक्रमतेचा अभाव' असा कायमचा स्वभाव असेल तर काही ठिकाणी फायदा तर काही ठिकाणी तोटा होणार. तुमच्या कार्यक्षेत्रावरही हे बरेच अवलंबून असते. व्यापार, धंदा, व्यवसाय, ठेकेदारी अशासारख्या कामासाठी आक्रमक स्वभाव असणे आवश्यक/क्रमप्राप्त ठरते (पुन्हा: प्रत्येक परिस्थितीत नव्हे). तर नोकरी, संभाषण, परस्पर संवाद, ग्राहक सेवा, अध्यापन अशा क्षेत्रात आक्रमकता ही अपात्रता ठरू शकते.
विविध परिस्थितींना योग्य तऱ्हेने हाताळणे हे कौशल्याचे काम असते. ते ज्यांना जमते ते व्यवस्थापनात यश मिळवू शकतात.