या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया वाचून बरे वाटले. सर्वप्रथम विकिपीडियाचा उल्लेख येथे करण्याचे राहून गेले. त्याबद्दल दिलगीरी...
शिव्यांचा आणि इतर अपशब्दांचा संग्रह असावा या बद्दल मी सहमत आहे. मी काही वर्षांपूर्वी असा संग्रह महाजालावर पाहिल्याचं अंधुकसं आठवतं मात्र ते लिखाण रोमन लिपीतील मराठी होतं. अर्थात आमच्या अगाध ज्ञानात तेथे भरच पडली. येथे मुद्दाम एक बोलावेसे वाटते की, सुप्रसिद्ध मराठी कवी - लेखक श्री विठ्ठल वाघ यांची भूमिका अशी आहे की मराठी भाषेच्या संवर्धनात शिव्यांचा आपला एक महत्वाचा वाटा आहे.
मनोगतावर कुणाला कशाची अनुमती असावी आणि कुणाला काय दिसावे याची चर्चा चाललेली आहे. यात माझं मत असं की हे सगळं करताना मनोगताची सुलभता दूर व्हायला नको.
मनोगत म्हटलं म्हणजे सोपं आणि सहज असावं हीच अपेक्षा असते. ते कुठलंही असेना, म्हणजे आंतरजालावरचं असो अथवा अंतर्मनातील असो
विचक्षणजी, तुम्ही मला एकेरीने संबोधू शकता. खरं तर मला ते आवडतं. तुमच्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद.
नीलकांत.