भाऊ म्हणतात ते खरं आहे. सहकार म्हणावा तसा विदर्भात रुजलाच नाही. काही मोजकेच प्रयत्न काही अशी सफल झाले. त्या पैकी नितीन गडकरींच्या पूर्ती या समूहाचे नाव घेऊ शकतो.

विदर्भात दूध उत्पादन वाढावे म्हणून महानंद योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र आज विदर्भ या क्षेत्रात कुठे आहे हे बघायचं असल्याच ढोबळ मानाने असं म्हणता येतं की विदर्भाती ११ जिल्ह्यांत जितकं दूध उत्पादन होतं तेवढं एकटं कोल्हापूर जिल्ह्यात तयार होतं. विदर्भात अकलुज आणि संगमनेरचं दूध एवढ्या दूर पॅक होऊन येतं. मात्र विदर्भात मोठी डेअरी नाही. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील डेअरी प्रकल्प हाच काय तो याला अपवाद असावा. कृषी पदवीधर बिटी विकताहेत....  पं. कृ. विद्यापीठातील अधिकारी आकाशवाणी आणि पत्रा द्वारे सामान्य शेतकऱ्यांशी जलद(?) संपर्क साधत आहेत.

विकास म्हणजे मला विदर्भाची आर्थिक प्रगती , दरडोई उत्पन्नात वाढ, लोकांच्या क्रयशक्तीत वाढ, राजकीय इच्छाशक्तीची जागृती. आदी अपेक्षीत आहे.

मिलींदजी, मी अचलपूर चा नाही. मात्र अमरावतीला काही काळ असल्यामुळे बच्चू कडू यांचे काम, धडक आंदोलने आणि तत्काळ उपाय करण्याची पद्धत युवकांना आकर्षीत करते. हे जवळून पाहिले. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असतानाच ते लोकसभेसाठी उभे राहिले. त्यामुळे मी माझा उत्साह आवरता घेतला. आज ते अचलपूर विधानसभा संघाचे प्रतिनिधी आहेत.

माफ करा पण चाणक्य काय म्हणताहेत ते काही समजले नाही. बोईंगच्या उच्चाधिकाऱ्यांचं नाव द्यावे ही विनंती. प. महाराष्ट्राचा उल्लेख लक्षात नाही आला.

क. लो. अ.

नीलकांत