एकंदर कथा खूपच चांगली आहे. धक्का देणारी, ओघवती आणि वेगवान. पण काही वाक्ये साचेबद्ध वाटतात. शेवट आवडला नाही. बहुदा गूढकथा वाचण्याकडे माझा कल नसावा. तुम्हाला लवकरच स्वतःची शैली सापडेल अशी सदिच्छा.

एक शंका....

'झुंजुमुंजू होणं' हे सकाळी जे तांबडं फुटतं त्या वेळेला म्हणतात असा माझा आत्तापर्यंत समज होता. शब्दाची व्युत्पत्ती बैलांच्या घुंगरांच्या नादावरून असावी (हा देखिल माझा समज). तिन्हीसांजेच्या वेळेला 'झुंजुमुंजू होणं' हा शब्दप्रयोग आजवर ऐकला नव्हता. तो बरोबर आहे काय?