सुनील,

आपण प्रत्येक अपहरणात नाक मुठीत धरून शरण जात आलो आहे. मुफ्तीमहंमद च्या मुलीचे अपहरण विसरलात का? याने आपली प्रतिष्ठा कशी काय वाढली ते सांगाल का?

पंजाबातला दहशतवाद केवळ गिल व रिबेरो यांच्या बंदूकीनेच संपला, कुणाच्या पाया पडण्याने नव्हे! जर मनधरण्या करून अतिरेकी वा दहशतवादी द्रवत असते तर एव्हाना काश्मिर पुन्हा नंदनवन झाले असते, निरपराध हिंदुंचे स्मशान नव्हे.

अहिंसा म्हणजे काय? जे अपहृत झाले त्यांना विसरा आणि स्वतःची कातडी वाचवा? आणि त्याने अपहरण कर्ते तृप्त होतील अशी भाबडी आशा आपल्याला वाटते का?