खालील प्रसंग मुरावि नाही पण तरी या विभागात चपखल बसेल.. (ठिकाण मुद्दामून सांगत नाही)

एका प्रसिद्ध वार्षिक उत्सवात नविन स्वयंसेवकाला (संघाच्या नव्हे!) शेवटी प्रमुख पाहूण्याला पुष्पगुच्छ देण्यास सांगीतले. व्यासपिठावर जायची सवय नसल्याने गांगरून गेलेला तो बिचारा गडबडीत म्हणाला की "...आजच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून मी मंडळाच्या वतीने त्यांना पूच्छगुच्छ देतो"