माझी दुनिया, तुमचे विचार आणि तुमच्या घरच्यांचे आचार निर्विवादपणे चांगले आहेत.
मात्र, विसर्जनाचे महत्त्व आपल्या संस्कृतीत वेगळे आहे.
मातीचे गणपती जे तुम्ही भग्नावस्थेत पाहिलेत ते बहुधा सार्वजनिक असावेत, मोठे असावेत.
कुळाचाराचे गणपती मातीचेच असतात. परंतु लहान. आणि त्यांचे यथातथ्य व पूर्णपणे विसर्जन करण्याची खबरदारी भक्तच घेतात. मातीचा गणपती विसर्जित होतो तेव्हा मनातल्या भावनाही पूर्णपणे निरस्त कराव्यात ही भूमिका असते.
सोन्याचांदीच्या गणपतीबाबत हे साधणे अवघड आहे.
सुघड मूर्तीचे अस्तित्त्व संपवणे कठीण होते. ती वितळवणे तर आणखीनच!
राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज म्हणतातः
मातीचा देव त्याले पान्याचा भेव
सोन्याचांदीचा देव त्याले चोरांचा भेव
देव अशाने भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे
म्हणून मला म्हणायचे आहे ते हे, की जैवविघटनकारी मूर्तींचे
प्रतिष्ठापन आणि विसर्जन हे, 'माणसाच्याच, माती असशी, मातीत मिळशी'
स्वरूपाच्या अस्तित्वाशी तादात्म्य साधणारे असून त्याचा अवलंब जास्त श्रेयस्कर आहे.