उत्तम माहिती मिळाली. लेख आवडला. लेखामागील मेहनतीला दाद देतो. 

चित्तरंजन

अवांतर

डिवाइन राइट ऑफ़ किंग्ज़ ही केवळ हिंदू थिअरी नसावी. चीनमध्येही राजाला देवाचे अंश मानायचे. जपानातही. जपानच्या सम्राट हिरोहितोने द्वितीय महायुद्धानंतर 'मी ईश्वराचा अवतार नाही' असे जाहीर केले, हे देखील आठवत असेलच.

सम्राट अशोकाचे एक नाव देवनामप्रिया होते. हे नाव बहुधा प्रशस्तींवर आणि शीलालेखांवर आढळते. किंबहुना ह्या नावामुळेच अशोकाची ओळख पटण्यात मदत झाली. रोमिला थापर ह्यांचे अशोकावरचे पुस्तक वाचून योग्य माहिती देता येईल.

शुद्धिचिकित्सकाला विसरलेल्या दिसता.