बाकी ओळी (लिहिलेल्या ऱ्हस्वदीर्घांप्रमाणे) वाचताना अडखळायला झाले.

सहमत.कदाचित शुद्धलेखन अबाधित राखण्यासाठी तुषारने असे केले असावे. खालीलप्रमाणे बदल केल्यास वाचताना छंदात वाटते. कविता छंदबद्ध करण्यासाठी ह्र्स्व-दीर्घाच्या नियमांतून सूट घेण्यास व्याकरणाची मान्यता आहे.

तू लिहिले कितिही भावुक, तरिही ते म्हणतिल त्यावर
लिहिणारा छानच लिहितो, तांब्यांची पण ये ना सर

आनंद व्यक्त होण्याचा, लिहिताना घेतो आपण
का उदास होतो तरिही, कोणाला नावडले तर?

सगळ्यांना खुश करण्याचा, तू चंग बांधला तरिही
काहीजण म्हणतीलच रे, शब्दांची जत्रा आवर

लिहिताना लिहि रे वेड्या, प्रामाणिक भाव मनाचे
लिहिण्यातुन उतर असा की, काटा यावा अंगावर

शब्दांचे घेउन धागे, कवितेला वीण असेकी
अर्थांची ऊब मिळावी, कवितेला पांघरल्यावर