आशाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा तिनेच गायलेल्या गाण्यातील शब्दांनी.

तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार.

२८ तारखेला लताचाही वाढदिवस येतो आहे. या दोघा स्वरसम्राज्ञींचे एकत्रित छायाचित्र पाहून त्यांनी गायिलेली काही द्वंद्वगीते आठवतात. उदा.

१)सखी री सुन बोले पपीहा उसपार
२)ओ चांद जहाँ वो जाए
३)कोई आएगा , आएगा आएगा , हमरे गाँव कोई आएगा
४)मैं चली मैं चली
५)कर गया रे, कर गया मुझ पे जादू.. सावरिया
६)मनभावनके घर जाए गोरी, बनी रहे ये प्यार की डोरी ..हमें ना भुलाना
७)मेरे मेहबूब में क्या नहीं.. क्या नहीं
८)प्यार से प्यार करो ये उम्र प्यार की है
९)मन क्यों बहका री बहका आधी रात को

अजून काही गीते माहित असल्यास कृपया कळवावीत. पण ही सर्व अर्थातच हिंदी चित्रपटातील आहेत. मराठी मध्ये या दोघींनी एकत्रितरित्या गाणी गायली आहेत का?

तात्यांनी नुकत्याच विचारलेल्या थोरली की धाकटी या विषयावर लिहून झाले असल्याने अधिक लिहीत नाही.

 - आशालतांचा पंखा, मंदार