मराठीविषयीची अनास्था ही मराठी माणसाच्या अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. रस्त्यावरून चालताना आजूबाजूला लावलेले फलक वाचले तरी ही गोष्ट कोणाच्याहि लक्षात येईल.  जे मराठी वाचवण्यासाठी आंदोलने वगैरे करतात तो त्यांच्या राजकीय पुनरुत्थानाच्या प्रयत्नाचाच एक भाग असतो. त्यांची स्वतःची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतात आणि घरी आपल्या आई-वडिलांना मम्मी-पप्पा असेच संबोधित असतात. तेव्हा ज्याना खरंच मराठी भाषेच्या भविष्याची चिंता आहे त्यांनी प्रथम आपल्या घराच्या मराठीकरणाला ताबडतोब सुरुवात करावी. असं मला वाटतं.