आंब्यांच्या कोड्यात अजूनही काही लोकांना रस आहे असे दिसते. म्हणून काही दिवसांपूर्वी मीराताईंना पाठवलेला खुलासा इथे उद्धृत करतो आहे.
काही गोष्टी स्पष्ट करायच्या राहून गेल्या होत्या.
०. गणिती गृहीतक - सर्व आंबे दिसायला, आकाराने, वजनाने सारखे आहेत.
१. कोड्याचा गणिताशी, निदान अंकगणिताशी, संबंध आहे. उत्तरासाठी आकडेमोड करावी लागते.
२. काही कॅच/आडवा विचार आहे का?
तर आडवा विचार आहेच. त्याशिवाय कोड्यात काय अर्थ उरेल?
३. एकमेकींना आंबे विकले नाहीत, गिऱ्हाईकांनाच विकले. आणि एकमेकींना विकले असते तरी फरक पडला नसता.
४. आणि एकमेकींना किंवा इतर कोणालाही आंबे किंवा पैसे उगीचच किंवा असेच देण्याचा गणितबाह्य प्रकारही केला नाही.
५. किंवा त्या वेड्या/खोटारड्या होत्या, त्यांना पैसे मोजता येत नव्हते, भाव कळत नव्हते, अशापैकी फालतू पीजे-टाइप उत्तरही नाही.
कोडे चांगले किंवा क्लासिक म्हणता येईल असे आहे. फक्त ते अत्यंत जुने आहे एवढाच काय तो दोष. म्हणून मी ते मेनस्ट्रीममध्ये दिले नव्हते.
वरील कारणांमुळे ॐ यांच्या व्यनिंद्वारा मिळालेली दोन्ही उत्तरे स्वीकार्य नाहीत
उत्तर देण्यापूर्वी अजून एक-दोन दिवस थांबावे असे वाटते आहे.
दिगम्भा