कोणत्याही त्रिकालाबाधित वैज्ञानिक तत्त्वाचा सामान्यतः निरीक्षण->अनुमान->सूत्र असा प्रवास असतो असे वाटते.

निरीक्षणाची नोंद असणे हे सूत्राचे अस्तित्त्व दाखवतेच असे नाही. पण सूत्र मांडले असेल (आणि ते सूत्र स्थलकालाची बंधने ओलांडून सिद्ध झाले असेल)तर निरीक्षण आणि अनुमानाचा यशस्वी प्रवास झाला आहे असे म्हणता येते.

===

भूमितीमध्ये 'पाय' सगळीकडे कडमडतो. त्याची किंमत 'आपल्या' कोणत्या ग्रंथात (कटपयादि सूत्रे १, कटपयादि सूत्रे २, कटपयादि सूत्रे- ३ या द्वारे किंवा कसे) मांडली (आर्किमिडीजच्या आधी किंवा नंतर) आहे काय?